देवेंद्र फडणवीसांना किशोरी पेडणेकर यांचं शिवसेना स्टाईल उत्तर, म्हणालात भाजपने..

देवेंद्र फडणवीसांना किशोरी पेडणेकर यांचं शिवसेना स्टाईल उत्तर, म्हणालात भाजपने..

मुंबई - ICMR च्या गाईडलाईन्सचं पालन न करता मुंबईतील 950 हून अधिक कोरोना मृत्यू लपवण्यात आले, इतके अक्षम्य दुर्लक्ष का? आता असं करणाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार? असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. याच आरोपावरून मुंबईत आता पुन्हा राजकारण पेटताना दिसतंय. फडणवीसांच्या याच आरोपाला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देवेंद्र फडणवीसांना शिवसेना स्टाईल ने उत्तर दिलंय. 

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर उत्तर देताना किशोरी पेडणेकर म्हणालात, मी तूर डाळीचा घोटाळा ऐकला होता, पण कोरोना मृतदेहांचा घोटाळा पहिल्यांदाच ऐकतेय. कोरोना हा गंभीर आजार आहे. यादरम्यान राजकारण करु नका. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्य सरकारने मृतांची आकडेवारी लपवली, असं वाटत असेल तर त्यांनी सिद्ध करुन दाखवावं. दरम्यान, राज्यात सध्या खालच्या पातळीवरील राजकारण सुरु आहे. महाराष्ट्रातील जनता ही महाराष्टरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे. अशात देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप खरे की खोटे हे जनता ठरवेल” असं महापूर किशोरी पेडणेकर म्हणालात. 

आणि आता भाजपने विधानसभा निवडणुकीत जनाधार जरी मिळवला असला तरी तो अपूर्ण आहे हे  मान्य करावं आणि केवळ राज्य सरकारला कसं हरवता येईल याकडे कल ठेवू नये, असं देखील मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणालात. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पत्रात 

सुमारे 950 हून अधिक कोरोना बळी न दाखविता ते लपवून ठेवणे ही एक अतिशय गंभीर बाब आहे. मुंबईच्या दृष्टीने विचार केला, तर हा संपूर्ण प्रकार अतिशय जीवघेणा आणि अतिशय धोकादायक आहे. कोरोना साथीमुळे झालेले मृत्यू जाहीर करण्यापूर्वी प्रत्येक प्रकरण हे मुंबई महापालिकेने गठीत केलेल्या ‘डेथ ऑडिट कमिटी’कडे जाते. या समितीने प्रत्येक प्रकरणावर शिक्कामोर्तब केल्यानंतरच तो मृत्यू कोरोनामुळे झाला, असे जाहीर केले जाते. आता दरम्यानच्या काळात सुमारे 451 अशी प्रकरणे आहेत, ज्यांचे मृत्यू कोरोनामुळे झाले.

तथापि ‘डेथ ऑडिट कमिटी’ने ती प्रकरणं नॉन-कोव्हिड केली. आयसीएमआरच्या निकषांप्रमाणे हे सर्व मृत्यू कोरोनामुळे झालेले आहेत. आता ही बाब उघडकीस आली आहे. इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी न दाखविण्याचे काम ‘डेथ ऑडिट कमिटी’ने कुणाच्या दबावात केले. या कमिटीवर काय कारवाई राज्य सरकारच्या वतीने केली जाणार आहे, असा सवाल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केला.

mayor on mumbai kishori pednekar reaction on devendra fadanavis statement about covid19 bodes

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com