esakal | सामनातल्या खोचक टीकेनंतर काँग्रेसनं केला 'असा' पलटवार
sakal

बोलून बातमी शोधा

thorat raut

शिवसेनेने सामना या मुखपत्रातून अग्रलेखाद्वारे महाआघाडीतील काँग्रेस नेत्यांनी चिमटे काढल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केला आहे.

सामनातल्या खोचक टीकेनंतर काँग्रेसनं केला 'असा' पलटवार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसला चिमटे काढण्यात आले. त्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सामनातील लिहिलेला अग्रलेख हा अपूर्ण माहितीच्या आधारे लिहिण्यात आला असल्याचं थोरात यांनी म्हटलं. तसंच हा अग्रलेख व्यवस्थित माहिती घेऊन लिहायला हवा होता. आमची भूमिका समजल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की समाधानी होतील, असा विश्वासही बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

हे वाचलंत का : काँग्रेसचा बडा नेता म्हणतोय, मलाही आत्महत्या करायचे विचार यायचे...

जनहिताचे काही निर्णय अपेक्षित आहेत, सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला डावललं जातंय असे ही बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले. काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात मुख्यमंत्र्यांनी भेटून चर्चा करणार असल्याची माहितीही मिळत आहे. 

नक्की वाचा : खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये, 'सामना'तून काँग्रेसवर निशाणा

काँग्रेस महाआघाडीच्या सरकारच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे बाळासाहेब थोरात सांगत असले तरी काँग्रेस नेते या ना त्या कारणाने सरकारमधील निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जात नसल्याची नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. त्यानिमित्ताने काँग्रेसची सरकारमधील खदखद समोर येत आहे. त्यामुळे काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मोठी बातमी! चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा रद्द; बाप्पाची मूर्ती घडणार मंडपातच...

सामनातून कसा साधण्यात आला काँग्रेसवर निशाणा -

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा त्यांना अनुभव आहे. सत्तेचा अमाप लोभ उद्धव ठाकरे यांना नाही. राजकारण हे अखेरीस सत्तेसाठीच असते आणि सत्ता कोणाला नको, असे नव्हे, पण उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील असे नेते नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रीपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये अशा शब्दात काँग्रेसच्या नाराजीवर सामानातून भाष्य करण्यात आले होते.

congress react on saamana editorial by sanjay raut read full story