esakal | मुख्यमंत्री म्हणाले, ठाण्याला निधीची कमतरता पडू देणार नाही; महापौरांनीही केली तत्काळ 225 कोटींची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री म्हणाले, ठाण्याला निधीची कमतरता पडू देणार नाही; महापौरांनीही केली तत्काळ 225 कोटींची मागणी
  • मुख्यमंत्र्यांकडे तब्बल  225  कोटींची मागणी
  • ठाणे महापालिकेला तारण्यासाठी महापैारांची मुख्यमंत्र्यांना साकडे

मुख्यमंत्री म्हणाले, ठाण्याला निधीची कमतरता पडू देणार नाही; महापौरांनीही केली तत्काळ 225 कोटींची मागणी

sakal_logo
By
राजेश मोरे

ठाणे  ः ठाणे शहराने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी चांगले काम केल्याचे प्रशस्तीपत्रक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. पण त्याचवेळी कोरोनाच्या काळात महापालिकेच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परीणाम झाल्याने महापालिकेचा कारभार चालविणे कठीण होत आहे. अशावेळी राज्य सरकारने ठाणे महापालिकेला तब्बल दोनशे पंचवीस कोटी रुपयांचो आर्थिक साहय करावे अशी मागणी महापैार नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेला निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले आहे. अशावेळी सत्ताधारी शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या मागणीकडे मुख्यमंत्री किती सकारात्मक पद्धतीने पाहतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

चिंताजनक! राज्यातील पोलिसांभोवती कोरोनाचा संकट वाढतेय; 24 तासांत उच्चांकी नोंद

ठाणे शहरात कोरोनावर मात करण्यासाठी किंबहुना कोरोनाचा नायनाट करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या सूचनांनुसार विविध उपाययोजना वेळोवळी राबविण्यात आल्या. यामध्ये मुंबईच्या धर्तीवर स्वतंत्र कोव्हिड रुग्णालयाची निर्मिती करणे, विलगीकरण कक्ष उभारणे, आवश्यक तज्ञ डॉक्टांराची नियुक्ती करणे, औषधे उपलब्ध करणे, रुग्णवाहिका उपलब्ध करणे, विलगीकरण कक्षातील नागरिकांना आवश्यक सेवासुविधा पुरविणे आदी कामे महापालिका प्रशासनाने योग्य प्रकारे केलेली आहे. ठाण्यातील सर्वच लोकप्रतिनिधी व प्रशासनाने युध्दपातळीवर काम केल्यामुळे ठाण्यातील कोरोना आटोक्यात येण्यास मदत झाली. परंतु महापालिकेच्या उपलब्ध आर्थिक तरतुदीमधूनच हा खर्च करण्यात आलेला आहे.

अशावेळी महापालिकेतील इतर दैनंदिन कामे देखील करणे आवश्यक आहे, कोरोना काळात महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असून महापालिकेकडे अन्य कोणतेही उत्पन्नाचे स्त्रोत नाही, याचा परिणाम इतर नागरी कामांवर होत असल्याची खंत महापैारांनी व्यक्त केली आहे. निधीची कमतरता अशीच राहिली तर भविष्यात ठाण्याच्या विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

महाड दुर्घटना! इमारत कोसळल्याने 8 जणांचा मृत्यू; पाच जणांवर गुन्हे दाखल; जाणून घ्या इमारतीविषयी सविस्तर माहिती

महापालिका कार्यक्षेत्रातील विकास कामे करणे आवश्यक आहे, तसेच कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी  भविष्यातही अनेक उपाययोजना राबविणे गरजेचे आहे. यासाठी निश्चितच निधीची आवश्यकता आहे. सद्यस्थितीतील महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक कामे करणे शक्य होणार नाही. त्यामूळेच कोरोना व त्या संबंधी उपाययोजना करण्यासाठी महापालिकेला 225 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आजवर महापालिकेने कोरोना संदर्भातील कामांसाठी कोट्यावधी रुपये खर्च केलेले आहेत. त्यामुळे महापालिकेची सद्य:स्थितीतील आर्थिक परिस्थिती विचारात घेता, महानगरपालिकेतील अन्य नागरी कामे आथिकदृष्ट्या करणे शक्य नाही. तरी राज्यशासनाच्या माध्यमातून कोरोना व त्यासंबंधीतील कामे करण्यासाठी अनुदान स्वरुपात रुपये 225 कोटींची आर्थिक मदत उपलब्ध करुन देण्याची मागणी महापैारांनी केली आहे.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top