esakal | पदवीच्या गुणांवरही MBA प्रवेश मिळणार; तंत्र शिक्षण संस्थेचा महत्त्वपूर्ण निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

पदवीच्या गुणांवरही MBA प्रवेश मिळणार; तंत्र शिक्षण संस्थेचा महत्त्वपूर्ण निर्णय

विद्यार्थ्यांना पदवीच्या अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे प्रवेश द्यावा, असे अखिल भारतीय तंत्र शिक्षण संस्थेने स्पष्ट केले आहे

पदवीच्या गुणांवरही MBA प्रवेश मिळणार; तंत्र शिक्षण संस्थेचा महत्त्वपूर्ण निर्णय

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई  : देश पातळीवर एमबीए प्रवेशासाठी अनेक परीक्षा घेण्यात येतात. यंदा, कोरोनामुळे बहुसंख्य विद्यार्थांना या परीक्षा देता आल्या नाहीत. अशा विद्यार्थ्यांना पदवीच्या अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे प्रवेश द्यावा, असे अखिल भारतीय तंत्र शिक्षण संस्थेने स्पष्ट केले आहे.  त्यामुळे परीक्षा हुकलेल्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. 

सुशांत आणि सारा अली खानच्या रिलेशनशिपबाबत मित्र सॅम्युएलचा धक्कादायक खुलासा, यामुळे झालं होतं ब्रेकअप.. 

कोरोनामुळे विविध अभ्यासक्रमांसाठी होणाऱ्या प्रवेश परीक्षा झाल्या नाहीत. त्याचप्रमाणे व्यवस्थापन शाखेतील विविध पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेशही रखडले आहेत. राज्यातील एमबीए परीक्षा पार पडली असून त्याचा निकालही जाहीर झाला आहे. एक लाख 10 हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असून परीक्षेत अवघ्या 5700 विद्यार्थ्यांना 100 पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. यासाठीची प्रवेश प्रक्रिया 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या प्रक्रियेसाठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण संस्थेने देशातील सर्व संस्थांसाठी महत्त्वाचा बदल सुचवला आहे. यानुसार प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्यांने प्रवेश द्यावेत असे निर्देश दिले आहेत. महाविद्यालयांत जागा उरल्यास त्या जागांवरील प्रवेश हे अंतिम वर्ष पदवी गुणांच्या आधारे करावेत, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संस्थांमध्येही जागा रिक्त राहणार नसल्याने तंत्र शिक्षण संस्थेने म्हटले आहे.

-------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top