नवी मुंबईत चालत होता हा गोरख धंदा; 20 कोटीचे मेफेड्रॉन जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जानेवारी 2020

  • तिघांना अटक;
  • "डीआरआय'ची कारवाई 
     

मुंबई : नवी मुंबईतील नेरूळ परिसरात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) केलेल्या कारवाईत 20 कोटींचे 50 किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. 11 मोबाईल आणि दोन महागड्या कारही "डीआरआय'ने आरोपींकडून जप्त केल्या. 

संजय राऊत म्हणालेः आमचं थोडं मीस कम्युनिकेशन झालं.

मोहम्मद सिकंदर चिमू (वय 40, रा. सांताक्रूझ), अन्वर फारुकी अहमद (33, रा. धारावी) आणि मोहम्मद रौफ सय्यद (27, रा. नालासोपारा) अशी आरोपींची नावे आहेत. चिमू या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. त्याच्या निरोपानुसार अन्वर आणि सय्यद शनिवारी सांताक्रूझ येथे चिमूच्या घरी गेले. तेथून दिघे नेरूळला पोहचले. तिथे एका रेस्टॉरंटमध्ये आरोपी बसले होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी रेस्टॉरंटबाहेर सापळा रचला होता. तिन्ही आरोपी पोहचल्यानंतर डीआरआयने त्यांना ताब्यात घेतले. आरोपींच्या कारची झडती घेतल्यानंतर त्यातील बॅगेत अधिकाऱ्यांना एमडीचा साठा सापडला.

महत्वाचं - या कारणामुळे मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या घटली

आरोपींकडून 11 मोबाईल आणि दोन कारही अधिकाऱ्यांनी जप्त केल्या. एमडीचा हा साठा अंधेरीला न्यायचा होता. त्यानंतर तेथून तो चकाला येथे पोहचवला जाणार होता, अशी माहिती आरोपींच्या चौकशीत पुढे आली. यामागे मोठी टोळी असण्याची शक्‍यता डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली. 
.... 
एमडीचा तुटवडा 
काही वर्षांत देशभरात मोठ्या प्रमाणत एमडीचा साठा पकडण्यात आला. त्यामुळे सर्वच ठिकाणी एमडीचा तुटवडा आहे. एरव्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडीची तस्करी केली जात नाही; मात्र तुटवड्यामुळे सर्वच पेडलरकडून मागणी येत असल्याने 50 किलोचा साठा घेऊन आरोपी जाणार होते. महागड्या कारबाबत संशय येत नसल्याने आरोपी त्यांचा वापर अशा गुन्ह्यांत करतात, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MD of Rs 20 crore Seized in Navi Mumbai