संजय राऊत म्हणतात 'आमचं थोडं मिस कम्युनिकेशन झालं'

संजय राऊत म्हणतात 'आमचं थोडं मिस कम्युनिकेशन झालं'

देशभरात CAA आणि NRC विरोधात दररोज आंदोलनं केले जातायत. अशात दिल्लीत CAA बाबत एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक सोनिया गांधी यांनी बोलावली होती. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडी ज्या पक्षामुळे स्थापन झाली, ती शिवसेना मात्र या बैठकीत उपस्थित नव्हती. आता सर्व विरोधीपक्ष एकत्र आलेत आणि शिवसेना या बैठकीत नव्हती म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्याचं पाहायला मिळालं. 

दरम्यान घडल्या सर्व प्रकारावर  शिवसेनेचे फायरब्रँड नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय.  काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आमचा संपर्क झाला, माझं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी बोलणे झाले. याचसोबत काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांच्याशी देखील बोलणं झालंय. आमच्यात थोडं मिस कम्युनिकेशन झाल्याने हा सर्व प्रकार पाहायला घडला आणि त्यामुळेच थोडी गडबड झाली असं संजय राऊत म्हणाले. आता यापुढे अशी गडबड होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असं देखील  राऊत म्हणालेत.

CAA मध्ये काही त्रुटी आहेत. या त्रुटी दूर झाल्याशिवाय शिवसेना कोणतीही भूमिका घेणार नाही, ही शिवसेनेची भूमिका आहे. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आधीच टिप्पणी केली आहे. महाराष्ट्रात हा कायदा जबरदस्तीने लादला जाणार नाही. काही गोष्टींचा खुलासा होईपर्यंत या महाराष्ट्रातील कोणत्याही जातीच्या भारतीय नागरिकांच्या केसाला देखील धक्का लागणार नाही, असं देखील संजय राऊत म्हणालेत.  

काँग्रेसकडून महाराष्ट्रात CAA कायदा अंमलबजावणीवरून दबाव आहे का विचारलं असता, प्रश्न दबावचा नाही मुख्यमंत्र्यानी घेतलेल्या स्पष्ट भूमिकेचा आहे. त्यामुळे दबाव या शब्दाचे प्रयोजन योग्य नाही. CAA  कायद्यात काही त्रुटी आहेत त्या दूर करणे गरजेचे आहे, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हंटल्याचं राऊत म्हणालेत.  

sanjay raut said there was misscommunication between congress and shivsena over CAA meet in delhi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com