Mucormycosis : शरीरातून लोह कमी करणारे औषध रूग्णांवर प्रभावी

Mucormycosis
Mucormycosissakal media

मुंबई : शरीरातील लोह (iron in human body) कमी करणारे औषध (Medicine) म्युकरमायकोसिसच्या रूग्णांवर (Mucormycosis patients) उपचार करण्यासाठी प्रभावी ठरले आहे. जेजे रुग्णालयातील (JJ hospital) कान-नाक-घसा विभागातील डॉक्टरांनी केलेल्या अभ्यासातून (Doctors study) ही बाब समोर आली आहे. (Medice which decreases human body iron impactful on mucormycosis patients)

Mucormycosis
दिल्लीसह 'या' सहा ते आठ शहरांमध्ये फाईव्ह जी; वाचा सविस्तर माहिती

कोरोनावर मात केल्यानंतर, काळ्या बुरशीच्या म्हणजेच म्युकरमायकोसिसच्या विळख्यात आलेले रुग्ण आता 7 दिवसांमध्येच बरे होऊ शकतात. अलीकडेच मुंबईच्या जेजे रुग्णालयातील  ईएनटी विभागाच्या डॉक्टरांनी मेडिसिन विभागाच्या डॉक्टरांच्या सहकार्याने एक अभ्यास केला. हा अभ्यास एका नवीन औषधावर करण्यात आला.

या अभ्यासात डॉक्टरांना असे आढळून आले की शरीरातील लोहाचे प्रमाण कमी करण्यासाठी वापरण्यात येणारे औषध काळ्या बुरशीच्या रुग्णांसाठी प्रभावी ठरले आहे. हे औषध शस्त्रक्रियेनंतर अँटीफंगल लस अॅम्फोटेरिसिन इंजेक्शन सोबत वापरल्यास, रुग्णाला रुग्णालयात कमी वेळ राहावे लागते.

Mucormycosis
'त्या' विद्यार्थांसाठी MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नाव नोंदणी सुरू

जेजे रुग्णालयातील कान-नाक-घसा विभाग आणि मेडिसिन विभागातील डॉ. श्रीनिवास चव्हाण, डॉ. युगंधर मेहरे, डॉ. अभिषेक कोंड आणि डॉ. राहुल राधाकृष्णन यांनी म्यूकरमायकोसिस रोगाच्या उपचारांवर अभ्यास केला आहे. हा अभ्यास म्यूकरमायकोसिस असलेल्या 30 रुग्णांवर करण्यात आला, ज्यात 9 महिलांचा समावेश आहे. डॉ . श्रीनिवास चव्हाण म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांना म्यूकरमायकोसिसची लागण झाली.

त्यांनी सांगितले की, काळ्या बुरशीच्या रूग्णांच्या उपचारात शस्त्रक्रिया आणि औषधाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शस्त्रक्रियेने रुग्णांच्या शरीरातून 100 टक्के बुरशी काढता येत नाही. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना बुरशीविरोधी लस दिली जाते. त्यामुळे रुग्णांना बराच वेळ रुग्णालयात राहावे लागते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आम्ही एक अभ्यास केला आहे. या अभ्यासात, रुग्णांच्या उपचारात डिफॅसिरॉक्स नावाचे औषध वापरले. 30 पैकी 15 रूग्णांवर उपचार करताना, आम्ही अॅम्फोटेरासिन इंजेक्शनसह डेफासिरॉक्स नावाचे औषध वापरले.

या रुग्णांमध्ये हे औषध खूप प्रभावी असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे. जे रुग्ण फक्त अँटी-फंगल इंजेक्शन ऍम्फोटेरासिन घेत होते त्या 15 रुग्णांच्या तुलनेत ज्यांना ऍम्फोटेरासिन इंजेक्शनसह डिफॅसिरॉक्स औषध दिले होते.ते आठवड्यापूर्वीच बरे झाले. यावर अधिक संशोधन झाल्यास रुग्णांच्या शरीरात काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखता येईल आणि त्यांचे प्राण वाचू शकतील, असे डॉ.श्रीनिवास यांनी सांगितले.

डिफॅसिरॉक्स वापर

डॉ. श्रीनिवास यांच्या मते, डिफॅसिरॉक्स ही एक गोळी आहे.  जेव्हा रुग्णाच्या शरीरात लोहाचे प्रमाण वाढते तेव्हाच ते वापरले जाते. या औषधाद्वारे डॉक्टर वाढलेल्या लोहाचे प्रमाण कमी करतात. आम्हाला असेही आढळून आले आहे की शरीरात लोहाचे प्रमाण जास्त असल्यास बुरशीचा प्रसार वेगाने होतो. म्हणूनच आम्ही बुरशीचा प्रसार थांबवण्यासाठी डिफॅसिरॉक्स औषध वापरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com