esakal | मोठी बातमी : ठाकरे - पवार यांच्यातली बैठक संपली, एक तास खलबतं... 
sakal

बोलून बातमी शोधा

मोठी बातमी : ठाकरे - पवार यांच्यातली बैठक संपली, एक तास खलबतं... 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे स्मारकावर बैठक पार पडली.

मोठी बातमी : ठाकरे - पवार यांच्यातली बैठक संपली, एक तास खलबतं... 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बाळासाहेब ठाकरे स्मारकावर बैठक पार पडली. जवळपास एक तास ही बैठक चालली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते उपस्थित होते. या बैठकीत दोन मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. त्यात आगामी काळातील राज्यपाल नियुक्ती सदस्यांविषयी चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. 

महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या 12 जागा रिकाम्या होत आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 10 सदस्यांची मुदत 6 जूनला तर 2 सदस्यांची मुदत 15 जूनला संपली आहे. या 12 जागांवर महाविकास आघाडी सरकारधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आपल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची वर्णी लावता येणार आहे. या 12 जागांचं कशापद्धतीनं वाटप व्हावं, या आणि अशा अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

मोठी बातमी : धनंजय मुंडे यांना झालेल्या कोरोनाबद्दल मोठी अपडेट, डॉक्टर म्हणालेत...

राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य कसं होतं? 

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेत 12 सदस्य नियुक्त करण्याचे राज्यपालांना अधिकार आहेत. मुख्यमंत्री राज्यपाल नियुक्त जागांच्या नावांची शिफारस मंत्रिमंडळ बैठकीत ठेवतात आणि त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर ती नावं मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठविली जातात.

यापूर्वी, राज्य मंत्रिमंडळाने दोनदा शिफारस केली होती. तेव्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांची राज्यपाल निर्देशित उमेदवार म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव प्रलंबित ठेवला होता. दोन रिक्त जागा भरण्यासाठी राष्ट्रवादीने केलेली शिफारस मंत्रिमंडळाकडून नसल्याचे कारण दिलं होतं आणि सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी असल्याचे सांगून राज्यपालांनी नकार दिला होता.

मोठी बातमी - कोरोनावर आलेल्या १०३ रुपयांच्या 'फॅबि-फ्लू' या गोळीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती...

6 जूनला मुदत संपलेले राज्यपालनियुक्त सदस्य

  • विद्या चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • ख्वाजा बेग (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • प्रकाश गजभिये (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • जगन्नाथ शिंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • रामहरी उपनवार (राष्ट्रवादी काँग्रेस)
  • जनार्दन चांदुरकर (काँग्रेस)
  • हुस्नबानू खलिफे (काँग्रेस)
  • आनंदराव पाटील (काँग्रेस)

15 जूनला मुदत संपणारे राज्यपालनियुक्त सदस्य

  • अनंत गाडगीळ (काँग्रेस)
  • जोगेंद्र कवाडे (रिपब्लिकन पार्टी कवाडे गट)

meeting between sharad pawar and cm uddhav thackeray finished in mumbai