महाशिवआघाडीची राज्यपालांसोबतची भेट पुढे ढकलली 

टीम ई-सकाळ
शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

आता सोमवारनंतरच महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटण्याची शक्यता आहे. 

मुंबई : महाशिवआघाडीच्या नेत्यांची राज्यपालासोबत होणारी आजची नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पक्षांचे नेते त्यांच्या मतदारसंघात असल्यामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नेते अडकले मतदारसंघांत
महाशिवआघाडीतील नेते राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना भेटणार होते. पण, ही भेट पुढे ढकलण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचे एक शिष्टमंडळ सायंकाळी साडेचार वाजता राज्यपालांची भेट घेणार होते. पण, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार त्यांच्या मतदार संघात असल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नियोजित भेट पुढे ढकलली आहे. ही भेट आता केव्हा होणार याबाबत मात्र स्पष्टता करण्यात आलेली नाही. पण, आता सोमवारनंतरच ही भेट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

भाजपचे 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात : जयंत पाटील

 काँग्रेस-राष्ट्रवादीकडून शिवसेनेला झुकते माप शक्य

किमान समान कार्यक्रम तयार
महाशिवआघाडीच्या नेत्यांमध्ये दोन दिवस बैठकांचे सत्र झाल्यानंतर आता तिन्ही पक्षांचा मिळून किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यासाठी तिन्ही पक्षांचे श्रेष्ठी आग्रही होते. हा कार्यक्रम तयार असून, तो श्रेष्ठींकडे पाठवण्यात आल्याची माहिती काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी बोलताना दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meeting with maharashtra governor cancelled by shiv sena ncp and congress