बैठकींचे सत्र सुरूच, सरसकट लोकल प्रवासाची प्रवाशांना प्रतिक्षाच

प्रशांत कांबळे
Monday, 26 October 2020

घटस्थापनेनंतर रेल्वेने सरसकट महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिल्याने, इतर रेल्वे प्रवाशांनी सुद्धा राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडे सरसकट प्रवासाची परवानगी देण्याची मागणी केली आहे.

मुंबई : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन आणि पुर्नवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी 21 ऑक्टोबर रोजी तिन दिवसात सरसकट रेल्वे प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी देण्याची घोषणा केली होती. मात्र, पाच दिवस होऊनही अद्याप यावर निर्णय झाला नसल्याने, रेल्वे प्रवाशांमध्ये संताव व्यक्त केला जात असून, अद्याप रेल्वे प्रवासी लोकलच्या प्रतिक्षेतच आहे.

घटस्थापनेनंतर रेल्वेने सरसकट महिलांना रेल्वे प्रवासाची परवानगी दिल्याने, इतर रेल्वे प्रवाशांनी सुद्धा राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाकडे सरसकट प्रवासाची परवानगी देण्याची मागणी केली आहे. दरम्यान राज्य सरकारने सुद्धा लवकरच सरसकट प्रवाशांना लोकल सेवा सुरू करण्याचे संकेत दिले होते. मात्र, यासंदर्भात अद्याप फक्त बैठकीचे सत्रच सुरू असल्याने, लोकल प्रवासावरील निर्णय प्रलंबित आहे. त्यामूळे रेल्वे प्रवाशांकडून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहे.

रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे रेल्वे चालायला पाहिजे, यामध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या पिक अवर्स मध्ये फक्त पास धारकांनाच प्रवेश दिला पाहिजे. तर तिकीट प्रवाशांना दुपारी प्रवास द्यायला पाहिजे, असे नियोजन केल्यास रेल्वेला गर्दी कमी करता येईल

- मधु कोटीयन, अध्यक्ष, मुंबई रेल्वे प्रवासी संघंटना
 

महत्त्वाची बातमी दिशाच्या शुभेच्छांचा 'बाण' कोणाकडे? सोशल मिडियावर चर्चांना उधाण

वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघंटना सरचिटणीस यशवंत जडयार म्हणालेत की  लॉकडाऊनच्या काळात अनेक खाजगी कामगारांचे जॉब गेले आहेत तर काही कर्मचारी गेल्या सात महीन्यांपासून घरीच बसलेले आहे. कामाला जाणाऱ्यांना 30 रूपयांमध्ये पुर्ण होणाऱ्या प्रवासासाठी दैनंदिन 300 रूपये खर्च करून सुमारे आठ तास प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मदत व पुर्नवसन मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सरसकट रेल्वे प्रवाशांसाठी लोकल सुरू करावी, अन्यथा प्रचंड बेकारी वाढण्याची शक्यता आहे.

तर कल्याण कर्जत रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष श्याम उबाळे म्हणालेत की, लोकल प्रवास सुरू करण्यासाठी राज्य सरकार व रेल्वे प्रशासन यांचा परस्परांत समन्वय नाही. कार्यालयीन वेळेत बदल याशिवाय एकाच वेळी एकाच दिशेला प्रवासात होणारी दैनंदीन गर्दी याचे व्यवस्थापन ताबडतोब व्हायला हवे. नोकरी वाचविण्याकरीता गेल्या आठ महिण्यापासून रस्ते वाहतूकीने प्रवास करावा लागतो आहे. त्यासाठी रेल्वेने या प्रवाशांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यासाठी कोविड-19 च्या उपाययोजना राबवून राज्य आणि केंद्राने राजकारण सोडून प्रवाशांसाठी एकत्र येण्याची गरज आहे.

meetings after meeting local train travelers waiting to get green signal for  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: meetings after meeting local train travelers waiting to get green signal for