Mega Block : मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mega block local train railway mumbai

Mega Block : मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे मेगाहाल

मुंबई : मध्य रेल्वेवर आज (ता.२६) मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना प्रचंड गर्दिचा सामान करावा लागला. रविवार वेळापत्रकामुळे निम्म्या लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या होत्या. तसेच ब्लॉक संपून देखील रात्री उशिराने मध्य रेल्वेवरील लोकल विलंबाने धावत होत्या.

माटुंगा ते मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे धीम्या मार्गावरील लोकल फेर्‍यावर परिणाम झाला. याकाळात लोकल फेर्‍या सुमारे २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवासी बेहाल झाले होते. तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान स्थानकांदरम्यान ब्लॉकची कामे हाती घेण्यात आली होती.

यामुळे अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या. यामुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांनी पर्यायी मार्गाने प्रवास करण्याला पसंती दिली. मात्र ब्लॉक संपल्यानंतर ही मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल फेर्‍यामध्ये गर्दी असल्याने रेल्वे प्रवाशांसाठी रविवारी प्रचंड हाल झाले. विशेष म्हणजे दादर,कुर्ला, आणि ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी दिसून आली आहे.