BMC चा मेगा प्लॅन; जंबो कोविड सेंटर होणार जंबो लसीकरण केंद्र, दिवसाला 50 हजार नागरिकांना मिळणार लस

BMC चा मेगा प्लॅन; जंबो कोविड सेंटर होणार जंबो लसीकरण केंद्र, दिवसाला 50 हजार नागरिकांना मिळणार लस

मुंबई : कोरोना लसीकरणासाठी मुंबईत जोरदार तयारी सुरु झाली आहे. लसीकरणाच्या तयारीसाठी मुंबई महापालिकेकडून विविध स्तरावर काम सुरु आहे. कोविड लसिकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात मुंबईतील 50 लाख नागरीकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे. यासाठी प्रशासकीय इमारती आणि शाळांमध्ये लसिकरण केंद्र तयार करण्याचा विचार महानगर पालिका करत आहे. यासोबतच  मुंबईतील जंबो कोविड सेंटरचे देखील होणार जंबो लसिकरण केंद्रात रूपांतर केलं जाणार आहे. 

मुंबईतील BKC, नेस्को, दहिसर, मुलुंड तसेच NSCI याठिकाणी जंबो लसिकरण केंद्रे असतील. कोविड सेंटर आणि लसिकरण केंद्रातील नागरिकांचा एकमेकांशी संपर्क येणार नाही याचीही पुरेपुर काळजी घेतली जाणार आहे.  जंबो कोविड सेंटरच्या मोकळ्या जागेत ही लसिकरण केंद्रे असणारा आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्यानं आता मुंबई महापालिकेकडून जंबो कोविड सेंटर्समध्ये फारसे रुग्ण नाहीत. त्यामुळे, त्याचा लसिकरण केंद्रांसाठी वापर केला जाणार आहे.

मुंबईत एकूण १०० लसिकरण केंद्रांची तयारी करणार...

मुंबईत एका दिवसात तब्बल ५० हजार लेकांना लस टोचण्याची व्यवस्था केली जाणार आहे. दरम्यान सध्या दिवसाला 10 हजार नागरिकांना लस देता येईल यापासून लसीकरणाची सुरुवात होईल. प्रत्येक वॉर्डमध्ये किमान ५ लसिकरण केंद्रे असतील अशा प्रकारची तयारी सध्या सुरु आहे.

  • कोविड लसिकरणाच्या पहिल्या टप्प्यात खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील 1 लाख 25 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल 
  • दुसऱ्या टप्प्यात 5 ते 6 लाख फ्रंटलाईन कर्मचारी तसेच कामगारांचे लसीकरण करण्यात येणार
  • तिसऱ्या टप्प्यात तब्बल ५० लाख नागरिकांना लास देण्याचं लक्ष्य महापालिकेकडून ठरवण्यात आलं आहे

महानगरपालिकेने आठ रुग्णालयात लसिकरण केंद्र तयार केले असून कांजूरमार्ग येथे लस साठवणुक केंद्र तयार केले आहे. रोज 12 हजार जणांना लस देता येईल यासाठी 2245 कर्मचाऱ्यांचे 500 पथकं तयार केली आहेत. 

तीसऱ्या टप्यात सामान्य नागरीकांचे लसिकरण करण्यात येणार आहे. साधारणतः 50 लाख नागरीकांचे लसिकरण करण्याचा आराखडा पालिका तयार करत आहे. त्यासाठी प्रत्येक प्रभागात दोन या प्रमाणे 50 लसिकरण केंद्र तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शाळा आणि प्रशासकीय इमारतींमध्ये लसिकरण केंद्र तयार करण्याचा विचार आहे. महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त सुरेश ककानी यांनी शनिवारी आठ लसिकरण केंद्र आणि लस साठवणुक केंद्राची पाहाणी केली.

लहान मुलांचे लसिकरण

तिसऱ्या टप्प्यात सामान्य नागरीकांना लस देण्यात येणार आहे. साधारण 50 लाख नागरीकांना लस देण्याचे नियोजन सुरु आहे. यात, 50 वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरीकां बरोबर लहान मुलांनाही लस देण्याचा विचार आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेत झालेल्या सर्वेक्षणा अंतर्गत महापालिकेने प्रत्येक कुटूंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याचा वापर या लसिकरणासाठी करण्यात येणार आहे.

mega plan of BMC jumbo covid 19 centers will be turned into jumbo vaccination centers

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com