पत्रिपुलासाठी मेगाब्लॉक! मध्य रेल्वेचे वेळापत्रक जाहीर; पर्यायी एसटी, केडीएमटी, टीएमटी विशेष बसेस सोडणार

पत्रिपुलासाठी मेगाब्लॉक! मध्य रेल्वेचे वेळापत्रक जाहीर; पर्यायी एसटी, केडीएमटी, टीएमटी विशेष बसेस सोडणार

.

कल्याण - कल्याणमधील नवीन पत्रिपुल गर्डर लॉचिंगसाठी मध्य रेल्वेने 21 आणि 22 नोव्हेंबरचे मेगाब्लॉक वेळापत्रक जाहीर केले असून कल्याण डोंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान लोकल सेवा बंद असणार असून पर्याय म्हणून एसटी, केडीएमटी आणि टीएमटी मार्फत विशेष बससेवा सोडण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मुंबई विभागातील कल्याण येथे नवीन पत्रिपुल रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी रेल्वेमार्गावर 76.67 मीटर लांबीचे ओपन वेब गर्डर उभारण्यासाठी 4 ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक संचालित करणार आहे. पहिल्या टप्यात 21 नोव्हेंबर आणि 22 नोव्हेंबर रोजी मेगाब्लॉक तपशील या प्रमाणे शनिवार (ता 21) रोजी कल्याण ते डोंबिवली रेल्वे स्थानक दरम्यान लोकल सेवा बंद असणार असून लोकल गाड्या सकाळी सव्वा दहा ते दुपारी सव्वा दोन पर्यंत रद्द करण्यात येणार आहे. तर डोंबिवली ते कल्याण स्टेशन दरम्यान सकाळी 9 वाजून 50 मिनिटे ते दुपारी 2 वाजून 15 मिनिटे दरम्यान उपनगरी गाड्या धावणार नाहीत. ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत / कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला / ठाणे / डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. 

गाड्यांचे मार्ग बदल
• 02168 मंडुआडीह- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष,
01059 लोकमान्य टिळक टर्मिनस -छपरा विशेष,
02542 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर विशेष
आणि
01061 लोकमान्य टिळक टर्मिनस-दरभंगा विशेष
दिवा-वसई रोड-जळगाव मार्गे वळविण्यात येणार आहेत

• कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्या भिवंडी रोड आणि दिवा येथे थांबविण्यात येतील. 

गाड्यांचे नियमन

• 02812 हटिया-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष
(टिटवाळा येथे),
01094 वाराणसी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष (खडवली येथे),
02617 एर्नाकुलम - हजरत निजामुद्दीन विशेष (दिवा जवळ)
आणि
4151 कानपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेषचे वाटेमध्ये नियमन
15 मिनिट ते 105 मिनिटांसाठी केले जाईल. 

गाड्यांचे वेळापत्रक पुन:निर्धारण.....
• 01071 लोकमान्य टिळक टर्मिनस - वाराणसी विशेष
21 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता सुटेल
आणि
01093 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -वाराणसी विशेष
ता 22 नोव्हेंबर रोजी 1 वाजता सुटेल 

दुसरा दिवस 
ब्लॉक
- रविवार 22 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजून 50 मिनिटं दुपारी 1 वाजून 50 मिनिटं पर्यंत 

रद्द उपनगरी गाड्या
• डोंबिवली ते कल्याण स्थानकांवर सकाळी 9 वाजून 20 मिनिटाला दुपारी 1 वाजून 50 मिनिटे दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. 
• ब्लॉक कालावधीत कल्याण ते कर्जत / कसारा दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील. 
• ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज ते कुर्ला / ठाणे / डोंबिवली दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

पत्रीपूलावरून अवजड वाहनांना बंदी 

पर्यायी रस्त्यावर पूल आणि रस्त्याचे अर्धवट कामामुळे मेगाब्लॉक काळात पत्रिपुल वरून अवजड आणि मालवाहू वाहनांना बंदी घालण्यात आली असून रुग्णवाहिका, एसटी, केडीएमटी, टी एमटी, एनएमटी बसेस, रिक्षा, दुचाकी वाहनांना प्रवास करण्यास मुभा  असणार आहे. अशी माहिती माहिती कल्याण वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिली .


विशेष बससेवा 

मेगाब्लॉक दरम्यान केडीएमटी ने 25 विशेष बसेस उपलब्ध केल्या आहेत.
कल्याण ते डोंबिवली 10 बस
टिटवाळा ते कल्याण 5 बस
विठ्ठलवाडी ते डोंबिवली 5 बस
आणि
कल्याण ते बदलापूर 5 बस
अशा एकूण 25 बसेस धावणार आहेत.

एसटी, टीएमटी एकूण 80 बसेस धावणार 

कल्याण ते ठाणे, कल्याण ते मंत्रालय, डोंबिवली ते ठाणे आणि डोंबिवली ते मंत्रालय अशा एसटी आणि टीएमटी च्या विशेष 80 बसेस धावणार आहेत.

Megablock on CR for Patri bridge Optional ST, KDMT, TMT bases ready

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com