
पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी फरार असलेला हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक करण्यात आलीय. त्याच्यावर १४ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप आहे. अटकेनंतर आता त्याच्या मुंबईतील मालमत्तांबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. तपास संस्थांनी मेहुल चोक्सी फरार झाल्यानंतर त्याच्या काही मालमत्ता सील केल्या होत्या. यात मुंबईत दादर, चर्नी रोडवर असलेल्या काही सोसायटींमधील फ्लॅट्सचा समावेश आहे. या फ्लॅट्सची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे.