esakal | डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्याचे वृक्षारोरोपण
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्याचे वृक्षारोरोपण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वडखळ : आध्यात्मिक ते बरोबरच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र भूषण डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान(Dr. Shri Nanasaheb Dharmadhikari Pratishthan) च्या वतीने पेण (Pen) तालुक्यातील उंबर्डे (Umbarde) येथील वनखात्याच्या जागेवर वृक्षारोपण करण्यात आले.याठिकाणी सहाशे वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

यावेळी पेण चे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रसाद गायकवाड,वनपाल चौधरी,वनरक्षक उगले, वारडे आदींसह पेण तालुक्यातील सोळा बैठकांतील श्री सदस्य उपस्थित होते.

पेण वनपरिक्षेत्र हद्दीतील उंबर्डे येथील साडेबारा एकर जागेवर फणस,जांभूळ,काजू,आवळा,पेरु,सीताफळ,बाहवा,कांचन,शिवण,रामफळ,बेहडा,करंज,विलायती चिंच,काशीद,वाबळा,शिसव ,बेल आदि वृक्षांचे रोपण करण्यात आले यावेळी या उपक्रमा मध्ये पेण तालुक्यातील वाशी नाका ,वाशी, रावे, वरवणे, वरसई, सापोली, धावटे, आंबिवली, जिते, हनुमान पाडा,दादर,शिर्की, वडखळ,भाल या सोळा बैठकांतील 432 श्री सदस्यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा: मुख्य न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी सेवानिवृत्त

या पूर्वी 2013 मध्ये याच वनपरिक्षेत्र मधील पाच एकर जागेत 4172 वृक्षांचे रोपण करुन पाच वर्षे त्यांचे उत्तमरीत्या संगोपन करुन वनाधिकारी यांच्या कडे सुपूर्द करण्यात आली आहेत.आज त्या ठिकाणी वृक्षांचे अरण्य तयार झाले आहे.

loading image
go to top