esakal | नेस्कोत कोरोना रुग्णांना मानसिक आधार; ऑनलाईन समुपदेशन
sakal

बोलून बातमी शोधा

नेस्कोत कोरोना रुग्णांना मानसिक आधार; ऑनलाईन समुपदेशन

गोरेगावच्या नेस्को कोव्हिड केंद्रात कोरोना रुग्णांसाठी ऑनलाईन समुपदेशन सुरू केले आहे.

नेस्कोत कोरोना रुग्णांना मानसिक आधार; ऑनलाईन समुपदेशन

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड


मुंबई : गोरेगावच्या नेस्को कोव्हिड केंद्रात कोरोना रुग्णांसाठी ऑनलाईन समुपदेशन सुरू केले आहे. केंद्रात दाखल झालेल्या रुग्णांसाठी महापालिकेने स्मार्टफोनच्या मदतीने स्वयंसेवी मानसशास्त्रज्ञांकडून ऑनलाइन व्हर्च्युअल समुपदेशन सत्र सुरू केले आहे. 

सावंतांना तज्ज्ञ समितीपेक्षा अधिक अक्कल आहे का? मेट्रो कारशेडप्रश्‍नी आशीष शेलार यांचा सवाल

कोरोनाची लागण झाली की, रुग्णांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होतो. यामुळे मानसिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. गेल्या सात महिन्यांपासून कोरोना रुग्णांचा मानसिक ताण प्रचंड वाढला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी समुपदेशनाचे सत्र ठेवण्यात आले आहे. पालिकेकडून पाच स्मार्टफोन दिले आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या रुग्णांचे समुपदेशन केले जाते. शिवाय ज्या रुग्णांना त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क करायचा असेल त्यांनाही या फोनद्वारे संपर्क करू दिला जातो. 

मुंबईकरांचे गतिमान प्रवासाचे स्वप्न साकार होणार : मुख्यमंत्री

तीन तास समुपदेशन 
प्रफुल्लता संस्थेचे समुपदेशक रुग्णांचे समुपदेशन करत आहेत. ज्यांना मानसिक त्रास आहे, अशा रुग्णांची यादी तयार करण्यात आली. ही यादी ऑनलाईन समुपदेशकांना पाठवली आहे. असे सहा-सात समुपदेशक आहेत जे दररोज तीन तासांचे समुपदेशन करतात. डाटा एंट्रीचे काही ऑपरेटर रुग्णांसाठी समुपदेशकांना कॉल लावून देतात. 

वॉर्डमध्ये जाऊन समुपदेशन करण्याची गरज पडत नाही. प्रत्येक रुग्णाला किमान 45 मिनिटांचे मोफत समुपदेशन केले जाते. कोव्हिडव्यतिरिक्त असलेला मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जातो. पाच स्मार्टफोनपैकी दोन आयसीयूतील रुग्णांसाठी आहेत. तेथूनही रुग्णांना फोन लावून नातेवाइकांशी संपर्क केला जातो. 
- डॉ. नीलम अंद्राडे,
अधिष्ठाता, नेस्को कोव्हिड केंद्र

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

loading image
go to top