मुंबईकरांचे गतिमान प्रवासाचे स्वप्न साकार होणार : मुख्यमंत्री

मुंबईकरांचे गतिमान प्रवासाचे स्वप्न साकार होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबईकरांचे गतिमान प्रवासाचे स्वप्न साकार होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबईकरांसोबतच ठाणेकरांचाही दैनंदिन प्रवास आरामदायी आणि गतिमान होण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या मेट्रो मार्गिका 4 आणि 4 अ प्रकल्प वेळेत पूर्ण होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच मुंबई महानगर परिसरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेत हा प्रकल्प आमुलाग्र बदल घडवेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबई मेट्रो मार्गिका 4 व 4 अ या प्रकल्पासाठी जर्मनीच्या केएफडब्ल्यु विकास बॅंकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्ज करारावर मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थित स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव आणि जर्मनीचे मुंबईतील वाणिज्यदूत जे. मोहार्ड यांनी करारावर स्वाक्षरी केली.

 
मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुसह्य होण्यासाठी मेट्रोच्या प्रकल्पांना गती दिली जात असून, मेट्रो मार्गिका 4 आणि 4अ साठी केएफडब्ल्यू संस्थेने मंजूर केलेले भारतातील सर्वात हे जास्त रकमेचे कर्ज आहे. सुमारे दोन लाख प्रवाशी दररोज ठाणे-मुंबई प्रवास करतात. पुढील काही वर्षात मुंबईतील सार्वजनिक दळणवळण व्यवस्थेत आमुलाग्र बदल होणार असून, त्यामुळे मुंबईकरांचे गतिमान प्रवासाचे स्वप्न साकार होणार आहे. असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 

केएफडब्ल्यू संस्था महाराष्ट्रासोबत पहिल्यांदा करार करीत आहे. हा प्रकल्प मुंबई महानगरातील प्रवाशांसाठी वरदान ठरणार असून, या प्रकल्पामुळे मुंबई आणि ठाणे हे दोन महनगरे जोडली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना काळात जम्बो उपचाराच्या सुविधांच्या उभारणीत एमएमआरडीएने बजावलेली महत्वाची भूमिका कौतुकास्पद आहे. 
- एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री. 

मेट्रो​ मार्गिका 4 प्रकल्पाचे वैशिष्ट्य 
1. देशातील इतर प्रकल्पांकरीता दिलेल्या कर्जपुरवठ्यापैकी सर्वात कमी व्याजदराचे कर्ज. 
2. मार्गिका 4- वडाळा-कासारवडवली आणि मार्गिका 4-अ कासारवडवली ते गायमुख या मेट्रो मार्गीकांच्या अंमलबजावणीकरीता केएफडब्ल्यू या जर्मन विकास बॅंकेकडून एकूण 545 दशलक्ष युरो इतक्‍या रकमेचे कर्ज इंडो जर्मन विकास सहाय्य अंतर्गत मंजूर 
3. केएफडब्ल्यु विकास बॅंकेकडून 545 दशलक्ष युरोचे कर्ज (देशातील सर्वाधिक रकमेचे कर्ज) 

------------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com