esakal | राजकारणाच्या गरमागरमीत मुंबईत थंडीची चाहूल
sakal

बोलून बातमी शोधा

राजकारणाच्या गरमागरमीत मुंबईत थंडीची चाहूल

राजकारणाच्या गरमागरमीत मुंबईत गुलाबी थंडीचे आगमन झाले असून आज मोसमातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे

राजकारणाच्या गरमागरमीत मुंबईत थंडीची चाहूल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : राजकारणाच्या गरमागरमीत मुंबईत गुलाबी थंडीचे आगमन झाले असून आज मोसमातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईत आज सांताक्रुझ येथे किमान 34.4 आणि कमाल 20.5 अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली आहे. तर, पुढील दोन दिवस कमाल तापामान एक ते दिड अंशाची घट होण्याची शक्‍यता असून किमान तपामानात दोन अंशाची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

बोरीवली पुर्व आणि गोरेगाव येथे मुंबईतील सर्वात कमी 19.40 सेल्सिअस कमी तापमान नोंदविण्यात आले. बोरीवली पुर्वेला संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे तर गोरेगावाला आरे वसाहत आहे. तर, आरे वसाहतीला लागून असलेल्या पवई भागात 20.9 सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.19 नोव्हेंबर 2012 रोजी नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी किमान 14.6 अंश सेल्सिअस तापमान नोंद झाली होती.तर,19 नोव्हेंबर 1950 ला नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी 13.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. 

मुंबईत सांताक्रुझ येथे 19 नोव्हेंबर रोजी कमाल 21.4 अंश सेल्सिअस तासानाची नोंद झाली होती.त्यानंतर तापमान 22 ते 23 अंशावर होते. मात्र, आज मोसमातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, कमाल तापमान 34 अंशाच्या पुढे असल्याने सकाळ नंतर गारवा जाणवला नाही. राज्याच्या किनारी भागात अद्याप कमाल तापमानात घट झालेली नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले. महामुंबईतील सर्वात कमी किमान तापमान पनवेल येथे 17.31 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. 

मुंबईसह संपुर्ण महामुंबईत गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या चारही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस कमाल तपामान 33 आणि किमान तापमान 22 अंशा पर्यंत राहील असा अंदाज व्यक्त करण्यता आला आहे. 

Webtitle : mercury dropped in mumbai winter is coming

loading image