निर्भयाच्या आरोपींना फाशी; मग कोल्हापूरच्या बाल हत्याकांडाला न्याय कधी ?

निर्भयाच्या आरोपींना फाशी; मग कोल्हापूरच्या बाल हत्याकांडाला न्याय कधी ?

मुंबई : फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपींंच्या दया याचिकेवर निश्चित अवधीमध्ये फैसला व्हावा आणि फाशीच्या अमंलबजावणीलाही वेळमर्यादा असावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. दिल्ली मधील निर्भया प्रकरणातील आरोपींना फाशी दिली जाते पण कोल्हापूर मधील बाल हत्याकांड प्रकरणात अद्यापही फाशीचा फैसला प्रलंबित आहे, असेही याचिकेत म्हटले आहे.

मुंबईसह देशभरातील न्यायालयांंमध्ये फाशीच्या शिक्षेसंबंधित प्रकरणे दाखल आहेत. यामध्ये सुनावणी किंवा फाशीची अमंबजावणी प्रलंबित आहे. याचा संदर्भ देणारी जनहित याचिका वकील डॉक्टर सुभाष विजयरन यांनी केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर मधील बाल हत्याकांड खटल्याचा उल्लेख केला आहे. यामध्ये प्रमुख आरोपी अंजना गावित आणि तिच्या दोन मुली, रेणुका शिंदे आणि सीमा गावित यांचा समावेश आहे. अंजनाचा मृत्यु झाला आहे तर रेणुका आणि सीमाला फाशी सुनावण्यात आली आहे. ही शिक्षा उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने कायम केली आहे.

आरोपींनी यानंतर राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. सन 2014 मध्ये ही याचिका फेटाळण्यात आली आहे. परंतु त्यानंतर फाशीच्या अमंबजावणीविरोधात दोन्ही बहिणींनी पुन्हा उच्च न्यायालयात फेरयाचिका केली आहे. ही फेरयाचिका अद्याप प्रलंबित आहे. याउलट दिल्लीमधील निर्भया बलात्कार हत्या प्रकरणातील दोषी आरोपींच्या शिक्षेवर तातडीने अमंलबजावणी करण्यात आली. कोल्हापूरमधील प्रकरणात गरीब बालकांचा समावेश असल्यामुळे याला विलंब होत आहे,  यामुळे सामाजिक असमानताही निर्माण होत असून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, असे याचिकादाराचे म्हणणे आहे. त्यामुळे फाशीची प्रकरणांच्या सुनावणीमध्ये मार्गदर्शक तत्वे निश्चित करावी, दया याचिकांच्या फैसल्याबाबत कालावधी निर्धारित करावा आणि प्रत्यक्ष फाशीच्या अमंबजावणीसाठीही कालमर्यादा असावी, अन्यथा कायदेशीर तरतुदींचे पालन न केल्याच्या कारणावरून दोषी आरोपी गैरफायदा घेऊ शकतात, अशा मागण्या याचिकादाराने केल्या आहेत. 

कोल्हापूरमध्ये पाच वर्षापर्यतच्या सुमारे 42 निष्पाप बालकांचे अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यामध्ये प्रमुख आरोपी अंजना गावित आणि तिच्या दोन मुलींंचा समावेश होता. अंजनाचा मृत्यु झाला असून दोन्ही दोषी मुली कारागृहात आहेत. सहा बालकांच्या हत्येमध्ये आरोपींना फाशी सुनावण्यात आली आहे. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयानेही फाशीची शिक्षा कायम केली आहे. फाशीची शिक्षा सुनावलेल्या त्या पहिल्या महिला आरोपी आहेत. सध्या दोघीही येरवडा कारागृहात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com