
डोंबिवली : महाराष्ट्रात आता इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठी, इंग्रजी सोबतच आता हिंदी ही तिसरी भाषा म्हणून शिकावी लागणार आहे. याला राजकीय स्तरातून विरोध होत असतानाच पालक व शिक्षकांची मत देखील वेगळी नाहीत. डोंबिवली मधील विद्यानिकेतन शाळेच्या बसवरील फलक याचेच संकेत देत असून हा फलक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.