

Mumbai Temperature
ESakal
मुंबई : राज्यात उन्हाळ्याचा कडाका वाढला असून, मुंबईही होरपळण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी (ता. १०) मुंबईसह उत्तर कोकणात उष्णतेच्या तीव्र लाटेचा तडाखा बसला असून, सांताक्रूझ वेधशाळेत तब्बल ४० अंश तापमानाची नोंद झाली; मात्र उपनगरांमध्ये परिस्थिती अधिकच गंभीर असून, राम मंदिर परिसरात पारा ४२.४ अंशांवर पोहोचल्याने मुंबईकर अक्षरशः भाजून निघाले आहेत.