

IMD Rain Alert
ESakal
पालघर : ऑक्टोबर संपत आला, तरीही पाऊस काही थांबत असल्याची चिन्हे दिसत नाहीत. ५ नोव्हेंबरपर्यंत पाऊस कोसळत राहील, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाची धडकी भरली आहे. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांवरील संकट अधिकच गडद होत चालले आहे. सर्वच शेतकरी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडले आहेत.