Mumbai Heat Temperature
Esakal
मुंबई : मे महिन्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. शुक्रवारी (ता.८) मुंबईतील तापमानात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय हवामान विभागाच्या स्वयंचलित हवामान केंद्रांनी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, मुंबई उपनगरात उष्णतेचा कडाका अधिक जाणवत असून राम मंदिर परिसरात तापमानाचा पारा ३८ अंशांपर्यंत पोहोचला आहे.