"मुंबईत उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत हे आमचे ध्येय" : राजेंद्र यड्रावकर

"मुंबईत उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत हे आमचे ध्येय" : राजेंद्र यड्रावकर

मुंबई, ता. 23 : महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेला उत्तम आरोग्य सुविधा आणि सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. हे आमचे ध्येय असून राज्य सरकारच्या अखत्यारितील मुंबईस्थित विविध रुग्णालयांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केले. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न सरकारच्यावतीने सुरू असून सार्वजनिक आरोग्य विभागाने मुंबई स्थित रुग्णालयांच्या सुविधा वाढविण्यावर भर द्यावा अशा सूचना आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

राज्य सरकारच्या अखत्यारितील मुंबईस्थित विविध रुग्णालयांच्या समस्यांबाबत शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट घेत यावर तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानुसार मुंबईतील सेंट जॉर्जेस आणि गोकुळदास तेजपाल रुग्णालय परिसरात तुळस व अन्य औषधी वनस्पतींची लागवड करून नैसर्गिकरित्या प्राणवायु उद्यान (ऑक्सीजन पार्क) उभारणे, रुग्णालयातील औषध पुरवठा, मास्क, पीपीई किट, शस्त्रक्रिया उपकरणांचा पुरेसा साठा उपलब्ध करणे, सिटी स्कॅन, एमआरआय व इतर वैद्यकीय तपासणी उपकरणे आधुनिक करणे आणि पुरेस मनुष्यबळ उपलब्ध करणे आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडे वर्ग केलेल्या रंगभवन थीएटरच्या जागेचा सुयोग्य वापर करणे असे अनेक प्रश्न मांडले. याबाबत आपण सकारात्मक असून लवकरच हे सर्व प्रश्न सोडविले जातील असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पांडुरंग सकपाळ यांना दिले. तर वैद्यकीय शिक्षण विभागाला यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले.

यासंदर्भात मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष बैठकीस शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि सर ज.जी. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजीत मानकेश्वर, सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक अशोक खोब्रागडे, गोकुळदास तेजपाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चिखलकर, कामा व आल्बेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पालवे, सर जे जे समूह रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि माजी नगरसेवक गणेश सानप, वैद्यकीय शिक्षण उपसचिव प्र ब सुरवसे, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले आदि अधिकारी उपस्थित होते.

( संपादन - सुमित बागुल )

we are determined to provide best healthcare to the citizens of mumbai rajendra yadravkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com