कारशेडअभावी मेट्रो- 3 प्रकल्प तीन वर्ष लांबणार?, खर्चात 2 ते 3 हजार कोटींची होणार वाढ

 कारशेडअभावी मेट्रो- 3 प्रकल्प तीन वर्ष लांबणार?, खर्चात 2 ते 3 हजार कोटींची होणार वाढ

मुंबई:  कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मेट्रो- 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी जागेचा शोध सुरू असल्याने हा प्रकल्प आणखी तीन वर्ष लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रकल्पाची डेडलाईन वाढणार असल्याने प्रकल्पाचा खर्चही सुमारे 2 ते 3 हजार कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. प्रकल्प वेगाने मार्गी लागावा यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) कडून प्रयत्न सुरू आहेत.

मेट्रो 3 प्रकल्पाच्या आरेमधील कारशेडसाठी झाडे तोडण्यास विरोध झाल्याने राज्य सरकारने आरेमधील कारशेड रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. पर्यायी कारशेडच्या जागेसाठी कांजूरमार्ग, पहाडी गोरेगाव येथील जागांचा विचार सुरु आहे. हा प्रकल्प मार्च 2021 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कारशेड आरेतून हलविण्याचा निर्णय घेतल्याने प्रकल्पाचा खर्च वाढेल आणि तो भार वाढीव तिकिटांच्या माध्यमातून प्रवाशांवर पडणार आहे.

नवीन कारशेडच्या जागेवर अद्याप शिक्कामोर्तब झाले नसल्याने हा प्रकल्प सुमारे तीन वर्षे लांबीवर जाणार आहे. भुयारी प्रकल्प वेळेत मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी अथक मेहनत घेतली. सुमारे 80 टक्के काम पूर्ण होत आले असले तरी प्रकल्प करशेड अभावी रखडला आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्च ही 2 ते 3 हजार कोटींनी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याबाबत एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यास सांगितले. जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी काहीही माहिती देऊ शकणार नसल्याचे सांगितले.

(संपादनः पूजा विचारे)

Metro-3 project to be extended for three years due to lack of car shed

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com