सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : मुंबईकरांना प्रतिक्षा असलेला भुयारी मेट्रो-३ चा तिसरा वरळी-कफ परेड हा टप्पा गुरूवारी सकाळपासून प्रवासी सेवेत येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी सदर टप्प्याचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना आरे-कफ परेड असा गारेगार मेट्रो प्रवास करता येणार आहे. दरम्यान मेट्रोच्या वरळी-कफ परेड या टप्प्याला उद्या सोमवारी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून प्रमाणपत्र मिळणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.