

Metro-4 Accident
ESakal
मुंबई : मेट्रो-४ वडाळा ते कासारवडवली या मार्गिकेचे काम करीत असलेल्या कंत्राटदाराकडून सातत्याने सुरक्षेच्या बाबतीत निष्काळजी केली जात आहे. नुकतेच वडाळा भक्ती पार्क येथे बांधकाम साईटवर झालेल्या अपघातात दोन कामगारांचा बळी गेला आहे. त्याची गंभीर दखल घेत एमएमआरडीएने कंत्राटदार आणि सल्लागाराला सहा कोटी रुपये दंडाचा दणका दिला आहे.