
मुंबई : मेट्रो-३ आरे-वरळी भुयारी मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खुशखबर आहे. आतापर्यंत रविवारी सकाळी ८.३० पासून सुरू होणारी मेट्रो रविवार ३१ ऑगस्टपासून सकाळी ६.३० पासून धावणार आहे. त्यामुळे सकाळी मेट्रोने कामावर जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच मेट्रोची प्रवासी संख्या वाढण्यास मदत होणार आहे.