

MHADA
ESakal
मुंबई : वारंवार लॉटरीत समावेश करूनही विक्री न झालेल्या घरांचा म्हाडाने प्रथम येणाऱ्यास प्राधान्य (एफसीएफएस) या तत्त्वावर ११८ घरांच्या विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याला इच्छुकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, दोन दिवसांत तब्बल ५४ घरांची विक्री झाली. त्यामध्ये सर्वाधिक वडाळा येथील २७ घरांची विक्री झाली असल्याचे समोर आले आहे.