
;
मुंबई, ता. २६ : आठ वर्षांहून अधिक काळ घराच्या प्रतीक्षेत असलेल्या गोरेगाव पत्राचाळीतील लॉटरी विजेत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लॉटरीधारकांच्या इमारतींचे काम पूर्ण करण्यासाठी खर्च केलेली वाढीव रक्कम वसूल करण्यासाठी घरांच्या किमतीत सात-दहा लाखांची वाढ करण्याचा म्हाडाचा प्रस्ताव होता. म्हाडाने तो स्वतःच गुंडाळल्याने लॉटरीधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.