

Mhada
मुंबई : मुंबईबाहेर एमएमआर क्षेत्रात म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मोठ्या प्रमाणात घरे उभारली जात असली तरी मोजक्या ठिकाणच्या घरांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणच्या घरांना फारसा प्रतिसाद मिळत नाही, कनेक्टिव्हिटीच्यादृष्टीने गैरसोय आहे अशा ठिकाणच्या भूखंडाची विक्री करून महसूल उभा करण्याच्या हालचाली म्हाडाने सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून म्हाडा अंबरनाथ येथील पाच भूखंडाची विक्री करून महसूल उभा करणार आहे. त्यासाठीच्या निविदा आचारसंहितेनंतर कोकण मंडळाकडून काढल्या जाणार आहेत.