
बापू सुळे
मुंबई : म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील विजेत्यांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने डिसेंबर २०२३मध्ये २६५ घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यापैकी जवळपास ७० लोकांनी दीड वर्षांनंतरही घराचा ताबा घेतलेला नाही. त्यामुळे म्हाडा ॲक्शन मोडवर आले आहे. संबंधितांना घराचा ताबा का घेतला जात नाही, यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्याला योग्य उत्तर न दिल्यास घराचा हक्क रद्द करण्याची कार्यवाही म्हाडा प्राधिकरणातर्फे केली जाणार आहे.