

MHADA House Price Fall
ESakal
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,६४० घरांची लॉटरी जाहीर केली आहे. या घरांच्या किमती जास्त असल्यामुळे या लॉटरीला कमी प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर म्हाडाने या लाॅटरीतील विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवारनगर प्रकल्पातील १,२२१ सदनिकांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या आहेत. त्यामुळे या घरांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.