Mhada
sakal
मुंबई : मुंबईत हक्काचं घरं घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र घरांच्या वाढत्या किमती पाहता बऱ्याच जणांना परवडत नाही. यामुळे सर्वसामान्य लोक म्हाडा किंवा सिडकोकडून निघणाऱ्या लॉटरीच्या प्रतीक्षेत असतात. नुकतेच म्हाडाने मुंबईसह उपनगरात घरांची लाॅटरी जाहीर केली. म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,६४० घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली आहे. या घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून म्हाडाचे घर घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.