Mhada House: म्हाडाची घरे खरंच परवडणारी? मुंबईतील घरांच्या किमती एक काेटीच्या पुढे

Mhada Mumbai House Price: म्हाडाने नुकतेच २ हजार ६४० घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली आहे. मात्र यातील मुंबईतील घरांच्या किमती काेटी रूपये असल्याने म्हाडाची घरे परवडणारी आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
Mhada Mumbai House Price

Mhada Mumbai House Price

ESakal

Updated on

मुंबई : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या किमती पाहून डाेळे पांढरे हाेण्याची वेळ आली आहे. मुंबई मंडळाने जाहीर केलेल्या अल्प उत्पन्न गटातील तब्बल १३९ घरांच्या किमती एक कोटी रुपयांपेक्षा अधिक आहेत. याच गटातील वरळीतील चार घरांच्या किमती दाेन कोटी आठ लाख रुपये आहेत. त्यामुळे या घरांसाठी अल्प उत्पन्नधारक अर्ज करणार का, ही घरे घेणे त्यांना परवडणार का, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com