

Mhada House Price Fall
ESakal
मुंबई : ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील गृहप्रकल्पातील घरांच्या किमती २०२०-२१च्या रेडीरेकनर दरानुसार निश्चित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज म्हाडाला दिले आहेत. त्यामुळे येथील घरांच्या किमती कमी होणार आहेत. तसेच यापूर्वी काढलेल्या म्हाडा सोडतीतील ४३४ विजेत्या लाभार्थ्यांना कायम ठेवत उर्वरित घरासाठी सोडत काढावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.