

Mumbai Mhada House Lottery
ESakal
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, वारंवार लॉटरीत समावेश करूनही विक्री न झालेल्या उच्चभ्रू वस्तीतील इमारतींमधील सुमारे १०० हून अधिक घरांची विक्री आता ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर केली जाणार आहे. यामध्ये ताडदेव, पवई आणि दादर येथील महत्त्वाच्या ठिकाणांवरील घरांचा समावेश आहे. या विक्रीसाठीची जाहिरात पुढील आठ ते दहा दिवसांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.