Mill Workers House: मुंबईसह ठाणे, मिरा-भाईंदरमध्येही घरे, गिरणी कामगारांसाठी म्हाडाचं मोठं पाऊल; जागेचा शोध सुरू

Mhada: गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी म्हाडाकडून मुंबईसह ठाणे, मिरा-भाईंदरमध्ये जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. यासाठी स्वारस्य निविदा मागवण्यात आल्या आहेत.
Mill Workers House

Mill Workers House

ESakal

Updated on

मुंबई : वर्षानुवर्षे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या गिरणी कामगारांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 'म्हाडा'ने कंबर कसली आहे. त्यानुसार कामगारांच्या घरांसाठी जागा उपलब्ध व्हावी, म्हणून म्हाडाने मुंबईबरोबरच ठाणे, मिरा-भाईंदर, उलवेपर्यंत जागेचा शोध सुरू केला असून, त्यासाठी स्वारस्य निविदा (ईओआय) मागवण्यात आल्या आहेत. ज्या विकसकांकडे पंतप्रधान आवास योजना किंवा अन्य घरकुल योजनेअंतर्गत किमान एक एकर जागा आहे आणि संबंधित नियोजन प्राधिकरणाकडून लेआऊट, विविध परवानग्या मंजूर आहेत, त्यांना निविदा भरता येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com