
मुंबई : सर्वसामान्यांसाठी घरे बांधणारी संस्था अशी ओळख असलेल्या म्हाडाने पुन्हा एकदा आपली ओळख अधोरेखित केली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने तब्बल ५ हजार २८५ घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. त्यामध्ये अल्यल्प म्हणजे वार्षिक सहा लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या गटासाठी तब्बल ४ हजार ८०२ घरे राखीव ठेवली आहेत. तसेच ९ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गटातील कुटुंबासाठी ४५५ घरे राखीव आहेत. यावरून कोकण मंडळाची लॉटरी सर्वसामान्य गोरगरीबांसाठी काढल्याचे स्पष्ट झाले आहे. या घरांसाठी ऑनलाईन आर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.