
MHADA Konkan Board Plots Auction
ESakal
म्हाडा कोकण मंडळातर्फे विरार बोळींज (जिल्हा पालघर) आणि चितळसर मानपाडा (जिल्हा ठाणे) येथील गृहनिर्माण प्रकल्प परिसरातील एकूण ७१ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी ई-लिलाव प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली आहे. गो-लाईव्ह कार्यक्रमांतर्गत म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांच्या हस्ते या ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज प्रक्रियेला प्रारंभ झाला.