

Mhada House Lottery Winner Relief
ESakal
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लाॅटरीत ठाण्याच्या चितळसर येथील घरांसाठी २५ वर्षांपूर्वी विजेते ठरलेल्या तब्बल १५६ जणांना मोठा दिलासा मिळाला आहे. संबंधितांसाठी म्हाडाने कोकण मंडळाच्या लाॅटरीत घरे राखीव ठेवली होती; पण त्याची किंमत काय असणार, हा प्रश्न होता. म्हाडाने आता २००० मध्ये जी किंमत होती, त्यावर केवळ चार टक्के व्याज आकारून सुमारे ३६ लाख ५१ हजार रुपये किमतीत घरे देण्याचा निर्णय घेतला आहे.