

MHADA
ESakal
मुंबई : अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाकडून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रात (एमएमआर) प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तब्बल १४०० घरे उभारली जाणार आहेत. त्यानुसार म्हाडाच्या कोकण मंडळाकडून अंबरनाथ, कल्याण परिसरात सदरची घरे उभारली जात असून ९५० घरांचे प्रत्यक्ष काम सुरू आहे, तर उर्वरित ४५० घरे वेगवेगळ्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. पुढील तीन वर्षांत या सर्व घरांचे काम पूर्ण केले जाणार आहे.