

MHADA House Lottery 2026
ESakal
मुंबई : म्हाडाच्या घरांच्या लाॅटरीकडे डोळे लावून बसलेल्या सर्वसामान्यांसाठी खुशखबर आहे. कोकण मंडळाकडून ठाणे, कल्याण, घोटेघर, डोंबिवली परिसरातील दोन हजारांहून अधिक घरांच्या लाॅटरीची जाहिरात फेब्रुवारीत काढली जाणार आहे. एप्रिल-मे महिन्यात या लाॅटरीचा बार फुटणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून गृहस्वप्न उराशी बाळगलेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.