

Mhada
मुंबई : विक्रीआभावी गेल्या तीन-चार वर्षांपासून पडून असलेली म्हाडाची घरे आता हातोहात विकली जाणार आहेत. अल्प उत्पन्न गटातील आणि पीएम आवास योजनेतील ही घरे असून ती खरेदी करू इच्छिणाऱ्यांचे उत्पन्न कमी असल्याने त्यांना गृहकर्ज सहजपणे मिळत नाही. त्यामुळे कोकण मंडळाची जवळपास १०-१२ हजार घरे आजही विक्रीविना पडून आहेत. त्यांची विक्री व्हावी, खरेदीदाराला कर्ज मिळावे म्हणून म्हाडाच्या कोकण मंडळाने टीईएनबी फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड या वित्तीय संस्थेसोबत करार करणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जवळपास ४० बँकांकडून कर्ज मिळू शकणार आहे.