
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने २००० साली काढलेल्या लॉटरीत विजेते ठरलेल्या तब्बल १५६ विजेत्यांना २५ वर्षांनी घरे मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. संबंधित विजेते ज्या चितळसर ठाणे येथील योजनेमधील घरांसाठी विजेते ठरले होते, ती घरे उभारण्यात तेव्हा महापालिकेने तांत्रिक अडथळा आणला होता. तेव्हापासून संबंधित अर्जदार घरांच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे त्यांना म्हाडाच्या कोकण मंडळाने नुकत्याच जाहीर केलेल्या सोडतीतील घरे लॉटरीशिवाय देण्याच्या हालचाली म्हाडाने सुरू केल्या आहेत.