

Mhada
ESakal
मुंबई : मुंबई शहरातील उपकरप्राप्त (सेस) इमारतींच्या पुनर्विकासास म्हाडाकडून चालना दिली जात आहे; मात्र या पुनर्विकासादरम्यान अनेकदा विकसक रहिवाशांचे भाडे थकवीत असल्याची बाब समोर आली आहे. याची म्हाडाने गंभीर दखल घेतली असून, भाडे थकवणाऱ्या विकसकांविरोधात घरी बसून तक्रार नोंदवता यावी, म्हणून नवीन पोर्टल सुरू केले जाणार आहे. त्यामुळे आलेल्या तक्रारींची दखल घेत तत्काळ कारवाई करणे म्हाडाला शक्य होणार आहे.