MHADA: स्वप्नाच्या शहरात स्वत:चं घर! म्हाडाच्या घरांची लवकरच लॉटरी निघणार, विकसकांकडून ५,५०० घरे मिळणार; तयारी सुरू

Mhada Konkan Mandal Housing Lottery: म्हाडाला विकसकांकडून ५,५०० घरे मिळणार आहेत. त्यामुळे लवकरच म्हाडाच्या घरांची लॉटरी निघणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Mhada Konkan Mandal

Mhada Konkan Mandal

Esakal

Updated on

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाकडून लवकरच घरांची लॉटरी जाहीर केली जाणार आहे. त्यांची खरी भिस्त खासगी विकसकांकडून मिळणाऱ्या घरांवर असणार आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, वसई-विरार आणि नवी मुंबई या चार महापालिका क्षेत्रांतील विकसकांकडून सुमारे साडेपाच हजार घरे मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्यक्षात किती घरे मिळणार, त्यावरच लॉटरीतील घरांचा निश्चित आकडा ठरणार आहे. त्यासाठी विकसकांकडून किती घरे मिळतील याची कोकण मंडळाकडून आकडेमोड सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com