Mhada: नागरिकांच्या प्रलंबित तक्रारींवर आता म्हाडाचा 'ऑन द स्पॉट' निर्णय
Latest Mumbai News: महिन्याच्या प्रत्येक सोमवारी संबंधित मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रारींबाबत झालेल्या निर्णयाची अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे.
Mumbai: प्रलंबित तक्रारींवर तातडीने निर्णय घेता यावा म्हणून म्हाडा मुख्यालयाप्रमाणे राज्यभरातील विभागीय मंडळामध्येही महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन घेतला जाणार आहे. नागरिकांच्या तक्रारींच्या तातडीने निवारणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.