

Mhada
ESakal
बापू सुळे
मुंबई : मुंबईसह एमएमआर क्षेत्रात नोकरी, व्यवसाय, शिक्षण, आरोग्याच्या सुविधांकरिता येणाऱ्यांना भविष्यात सहजपणे भाड्याने घरे उपलब्ध होऊ शकणार आहेत. भाडेतत्त्वावरील घरांना मोठी मागणी असतानाही अनेक जण असुरक्षेच्या भावनेतून आपले घर भाड्याने टाळतात. त्यामुळे घर भाड्याने देऊ इच्छिणाऱ्या घर मालकांना संरक्षण देतानाच भाडेकरूंना सहजपणे घरे उपलब्ध व्हावीत म्हणून राज्य सरकारच्या निर्देशानुसार म्हाडाने भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण धोरणाचा मसुदा तयार करून राज्य सरकारला सादर केला आहे. तो येत्या अधिवेशनात मांडला जाण्याची शक्यता असल्याने लवकरच भाडेतत्त्वावरील घरांसाठीचे धोरण आकाराला येणार आहे.