Mhada: उमरखाडीचा समूह पुनर्विकास, रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर मिळणार; म्हाडाचा राज्य सरकारकडे प्रस्ताव

Mhada Redevelopment Project: भायखळा येथील उमरखाडीचा समूह पुनर्विकासाबाबत म्हाडाने राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे.
Mhada Redevelopment Project

Mhada Redevelopment Project

ESakal

Updated on

मुंबई : भायखळा येथील उमरखाडी परिसराच्या समूह पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाने राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. ७०-८० वर्षे जुन्या असलेल्या उपकर प्राप्त (सेस) इमारतींबरोबरच येथे असलेल्या पीएमजीपी इमारती आणि खासगी मालकीच्या जवळपास ३६ इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे. त्यानुसार तब्बल २० हजार चौरस मीटरचा भूखंड पुनर्विकासासाठी उपलब्ध होणार असल्याने येथे गगनचुंबी इमारती उभ्या राहू शकणार आहेत. त्यामुळे म्हाडाने पाठवलेल्या प्रस्तावावर सरकार काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com